|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भरतनाटय़ममध्ये महाराष्ट्राच्या मराठी कन्येची छापभरतनाटय़ममध्ये महाराष्ट्राच्या मराठी कन्येची छाप 

सुनील पाटील/ आष्टा

अभिजात दक्षिण भारतीय नृत्यसंस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱया भरतनाटय़म या नृत्याविष्कारात महाराष्ट्राची कन्या अभिश्री आनंदराव पाटील हीने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवून तामिळनाडू, हिंदी भाषिकासह महाराष्ट्रातील तमाम भरनाटय़म प्रेमींना चकीत केले आहे. एका क्लास वन अधिकाऱयाच्या मुलीने कष्ट, जिद्द, चिकटीच्या जोरावर भरतनाटय़मध्ये मिळविलेले यश निश्चितच तरुण पीढीला प्रेरणा देणारे आहे.

अभिश्री पाटील ही क्लास वन अधिकारी आनंदराव पाटील यांची कन्या. अभिश्री पाटील ही संस्कृती विद्यालय नवी दिल्ली येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. वडील तामिळनाडू मध्ये असताना अभिश्रीला भरतनाटय़मची ओढ लागली. खरे तर खेळायच्या बागडायच्या वयातच अभिश्रीने भरतनाटय़मची कला अवगत करण्यात वेळ दिला. प्रशांती नाटय़ निलयमध्ये अभिश्रीने भरतनाटय़मचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. आणि अभ्यासाला कष्ट, जिद्द, चिकाटी व परिश्रमाची जोड देत भरतनाटय़ममध्ये आपली छाप उमटविण्यास सुरुवात केली. खरे तर एका क्लास वन अधिकाऱयाच्या मुलीने वेगळा पायंडा पाडताना वेगळया क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करण्याचा प्रयत्न केला.आणि यामध्ये उत्तुंग यशही मिळविले.

दिल्ली दुरदर्शनवरील उमंग या कार्यक्रमात ही अभिश्री पाटील हीने आपल्या नृत्याविष्काराची झलक संपूर्ण देशवाशियांना करुन दिली. अभिश्रीने भारतीय क्लासिकल शिक्षण घेतले. सुमारे पाच वर्षे भरतनाटय़मसाठी परिश्रम घेतले. अभिश्रीला लिखाणाची तसेच स्वतः लिहलेल्या कवितांना चाल तसेच संगित देण्याची कला अवगत असल्याने याचा फायदा तिला भरतनाटय़म मध्येही झाला. दररोज दोन ते अडीच तास सराव करताना अभिनयाच्या मुद्रा, डान्स यावर तिने भर दिला. भरतनाटय़म शिकताना आरोग्याकडेही लक्ष दिले. तसेच मानसिक दृष्टया सक्षम राहण्याचा तिने प्रयत्न केला. अभिनयातील छोटे-छोटे बारकावे शिकले.

दिल्ली येथील इंडियन हॅबिटेट हॉलमध्ये आरंगेत्रम कार्यक्रमात विलोभनिय नृत्याविष्कार सादर करीत महाराष्ट्राची मराठी मुलगी दक्षिण भारतीय नृत्यशैली समजल्या जाणाऱया भरतनाटय़म मध्ये आपली छाप उमटवली. यावेळी महाराष्ट्रातील मराठी भाषिकासह, हिंदी भाषिक तसेच तामिळनाडू येथील रसिक मोठया संख्येने उपस्थित होते. दिल्लीतील शासकीय अधिकाऱयांना एकत्र आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आयएफएस डीजी आयसीसीआर अमरयेंदु खतुआ, सुरेश जैन, चॅलेंजर दुराई, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगली जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम, पन्हाळा गट विकास अधिकारी प्रियदर्शनी मेरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभ़िश्री पाटील हीने उपस्थित हिंदी भाषिकांसाठी गिरीधर गोपाळा हे भजन सादर केले. तर तामिळनाडू येथील रसिकांसाठी थोडय़ामंगलम्, खांडाअलारिपो, जतीस्वरम्,वर्णम, आनंदतंदावम्, सादर केले. तसेच उपस्थित मराठी भाषिकांसाठी विठ्ठलाची ओढ, वारीतील सहभाग व विठ्ठल भेट व एकरुप या तिन भजनाच्या माध्यमातून मराठी लोकांना भावेल असे भरतनाटय़मचे सादरीकरण केले. सुमारे दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात अभिश्री पाटील हीने उपस्थित रसिकांची मने जिंकली. आरंगेत्रम् च्या यशामुळे देशात कोठेही भरतनाटय़मच्या कार्यक्रमात नृत्य सादर करण्याची परवाणगी आता अभिश्री पाटील हीला मिळाली आहे. मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात मागे नाही यावर ठसा उमटविण्याचे काम अभिश्री पाटील हीने केले आहे. तीचे यश महाराष्ट्रातील तमाम मराठी तरुण तरुणींना प्रेरणा देणारे तर संगीत प्रेमींची मान उंचविणारे आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!