|Thursday, June 22, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या प्रचारास प्रारंभउपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या प्रचारास प्रारंभ 

प्रतिनिधी/ म्हापसा

उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी खोर्ली म्हापसा येथील राष्ट्रोळी मंदिरात (खोर्लीसीम) येथे नारळ ठेवून आपल्या प्रचाराला प्रारंभ केला.

निवडणूक ही लोकशाही आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा हक्क आहे. त्यांनी निवडणुकीत आपली ताकद दाखवून विजयी व्हावे, असे डिसोझा म्हणाले. म्हापशात भाजपची उमेदवारी डिसोझा यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारास प्रारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष संदीप फळारी नगरसेवक राजसिंग राणे, सुधीर कांदोळकर, कविता आर्लेकर, सुशांत हरमलकर, संजय मिशाळ आदी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. त्यानंतर खोर्ली भागात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.

Related posts: