|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित

निपाणी सर्कल अधिकारी आर. बी. औरादी निलंबित 

वार्ताहर/ निपाणी

सौंदलगा, हंचिनाळ-केएस, भिवशी अशा तीन गावांच्या ग्रामलेखाधिकारी पदाची जबाबदारी असणारे व निपाणी विभागाचे प्रभारी सर्कल अधिकारी म्हणून सेवा बजावणारे आर. बी. औरादी यांचे निलंबन करण्याची कारवाई अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी केली. खातेउताऱयातील नावात बेकायदेशीररित्या बदल करण्यासाठी रक्कम स्वीकारल्याचे उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने निपाणीसह परिसरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये बिनधास्तपणे वरकमाई करणाऱया अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. तरुण भारतने या अधिकाऱयाचा भ्रष्टाचार पुढे आणण्यासाठी 8 डिसेंबर 2016 रोजीच्या अंकात उसन्या अधिकारातून भ्रष्टाचाराला उधाण असे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे या निलंबन कारवाईतून स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू आहे.

 याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, आर. बी. औरादी यांनी सौंदलगा येथील सर्व्हे नं. 306 मध्ये खातेउताऱयात नावे बदल करण्यासाठी वरकमाईच्या उद्देशाने काही रक्कम मागितली होती. ही रक्कम मागताना संबंधित शेतकऱयाने त्याचे रेकॉर्डिंग केले होते. हे रेकॉर्डिंग जिल्हाधिकाऱयांसमोर सादर होताच त्याची शहानिशा करून सरळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यामागील पूर्ण तपास करण्याचीही सूचना केली गेली असल्याचे समजते.

औरादी हे ग्रामलेखाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांच्यावर निपाणी सर्कल अधिकारी म्हणून प्रभारी अधिकारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. औरादी हे ग्रामीण भागात कमी पण निपाणी कार्यालयात अधिक वेळ देत काम करत होते. यामुळे ग्रामीण भागातील गरजू शेतकऱयांची मोठी अडचण होत होती. शेतकऱयांना आपली कामे पूर्ण करण्यासाठी एकतर एजंटांना गाठावे लागत होते किंवा औरादी यांना भेटण्यासाठी निपाणी कार्यालयात हजेरी लावावी लागत होती. यामुळे सर्वच शेतकऱयांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related posts: