|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » Top News » सेल्फीचा निर्णय तूर्त स्थगितसेल्फीचा निर्णय तूर्त स्थगित 

vinod

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थितीसाठी शिक्षकांना वर्गात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी या उपक्रमाला विरोध झाला. त्यानंतर सेल्फीच्या या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

student

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी राज्य सरकारने दर सोमवारी सेल्फी काढण्याचा निर्णय घेतला होता. सेल्फीला आकर्षित होऊन विद्यार्थ्यी आपली उपस्थिती लावतील, असा अंदाज राज्य सरकारला होता. मात्र, या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून या उलट शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल, असा दावा शिक्षक संघटनेने केला होता. त्यानंतर आज अखेर हा निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे.

Related posts: