|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » नोटाबंदी ही भाजपच्या अंताची सुरुवात : मनमोहनसिंग

नोटाबंदी ही भाजपच्या अंताची सुरुवात : मनमोहनसिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटाबंदी ही भाजपच्या अंताची सुरुवात ठरेल, असे म्हणत देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.

भारताला नोटाबंदीमुळे फायदा होईल, असे सांगितले जात होते. परंतु यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. भारताची आर्थिक रणनीती पूर्णतः फसली असून त्यांच्या पोकळ आश्वासनांची पोलखोल झाली. नोटाबंदीचा निर्णय ही भारतीय जनता पक्ष आणि मोदींच्या शेवटाची नांदी असल्याचेही मनमोहनसिंग म्हणाले.

तसेच गेली दोन वर्षे नरेंद्र मोदी भारताची अर्थव्यवस्था कशी असेल, याची आखणी करत होते. परंतु ती परिणामकारक ठरली नसल्याची टीका मनमोहनसिंग यांनी केली.