…तर मोदी उंदराच्या पिल्लूसारखे गुजरातमध्ये पळून जातील ; तृणमूलच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोलकत्यामधून असे आंदोलन उठेल, तेव्हा पंतप्रधान नरेद्र मोदी हे उंदराच्या पिल्लूसारखे गुजरातमध्ये पळून जातील, असे वादग्रस्त वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केले. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली.
एका रॅलीदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून तृणमूल काँग्रेस या निर्णयाचा सातत्याने विरोध करत आहेत. यातच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला जोरदार विरोध करत अनेकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, कल्याण बॅनर्जी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.