|Friday, July 28, 2017
You are here: Home » उद्योग » सौदीकडून भारताच्या खनिज तेल निर्यातीत कपातसौदीकडून भारताच्या खनिज तेल निर्यातीत कपात 

नवी दिल्ली :
सौदी अरेबियाने आगामी फेब्रुवारी महिन्यात भारतातील काही कंपन्यांना करण्यात येणाऱया खनिज तेलाच्या निर्यातीत कपात केली आहे. ओपेक देशांनी खनिज तेलाचे उत्पादन कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निर्यातीवरही त्याचा परिणाम दिसण्यास प्रारंभ झाला आहे.
सौदी अरेबिया सरकारच्या मालकीच्या सौदी ऍरमको या कंपनीने रिलायन्स इन्डस्ट्रीज आणि हिंदुस्थान मित्तल एनर्जी लिमिटेड या कंपन्यांना करण्यात येणाऱया खनिज तेलाची निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला. या भारतीय कंपन्यांव्यतिरिक्त मलेशियाच्या पेट्रोनास कंपनीचा सहभाग आहे. ऍरमको या कंपनीने सलग दुसऱया महिन्यात आशियातील निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतला. सौदी अरेबियातील या सरकारी कंपनीने निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युरोप आणि अमेरिकेतील काही तेल कंपन्या आपले उत्पादन 18 टक्क्यांपर्यंत कमी करतील असा अंदाज वर्तविण्यात आला. सौदी अरेबिया आणि कुवैत सध्या युरोप आणि अमेरिकेतील ग्राहकांना निर्यात कमी करण्याचा प्रयत्न करत असून आशियाई बाजाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ विरेंद्र चौहान यांनी म्हटले.
पूर्व आशियाई बाजारातील आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी पश्चिम आशियातील कंपन्या प्रयत्नशील आहेत. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत प्रतिदिनी 1.2 दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी करण्याचा ओपेक संघटनेने निर्णय घेतला आहे. तेलाच्या घसरत्या किमती पुन्हा वधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार सौदी अरेबियाने जानेवारी महिन्यात प्रतिदिनी 4,86,000 बॅरलने उत्पादन कमी करत 10.058 दशलक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!