|Friday, July 28, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रामगोपाल यादवांचे कुटुंब पक्षातील वादाला कारणीभूत !रामगोपाल यादवांचे कुटुंब पक्षातील वादाला कारणीभूत ! 

मुलायम सिंग यादव यांच्याकडून थेट आरोप

वृत्तसंस्था/ लखनौ

मुलायम सिंग यादव यांनी बुधवारी लखनौमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना अखिलेश जर रामगोपाल यांच्यापासून दूर झाले तर मुख्यमंत्री बनतील असे म्हटले. रामगोपाल यांचे पुत्र-सून यांच्या सांगण्यावरूनच पक्षात फूट पाडली जात आहे. आम्ही स्वतंत्र पक्ष बनवत नाही आणि त्याचबरोबर निवडणूक चिन्हही बदलणार नाही. आम्ही आमचा पक्ष सोडणार नाही, तो वाचवूच असे वक्तव्य मुलायम यांनी केले. 31 डिसेंबरपासून आतापर्यंत मुलायम आणि अखिलेश यांच्यात तडजोडीचे 8 प्रयत्न झाले आहेत. परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.

मी अखिलेशलाच मुख्यमंत्रिपद दिले जाईल हे लिहून देण्यास तयार आहे, परंतु अखिलेशने आधी स्वतः रामगोपालांपासून दूर व्हावे, ते त्याची दिशाभूल करताहेत. वादात पडू नको असे मी त्यांना सांगितले आहे. आम्हाला पक्षात एकता हवी आहे, तर ते वेगळा पक्ष बनवत आहेत असा दावा मुलायम यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर केला.

पक्ष बनविण्यासाठी आम्ही लाठीचा मार झेलला आहे. पक्ष विखुरला जावा असे वाटूच शकत नाही. मोठा संघर्ष करून समाजवादी पक्ष बनला आहे.  आणीबाणीच्या काळात मोठा संघर्ष केला, त्यानंतर निवडणूक लढविली आणि बहुमतात आलो, कार्यकर्त्याची मेहन आणि संघर्षामुळेच पक्ष पुढे आल्याचे त्यांनी म्हटले.

भाजपशी हातमिळवणी

रामगोपाल यादव दुसऱया पक्षाच्या अध्यक्षाशी 4 वेळा भेटले, रामगोपाल पुत्र-सुनेच्या सांगण्यावरून पक्षाचे विभाजन करू पाहताहेत. रामगोपाल  अखिल भारतीय समाजवादी पक्ष बनवित आहेत. ते या नव्या पक्षासाठी मोटरसायकल चिन्ह मागणी करत आहेत. काही लोक भाजपला जाऊन मिळाले, परंतु त्यामुळे आमच्या पक्षाच्या एकतेत कोणताही अडथळा आला नसल्याचे मुलायम यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांचे बळ

माझ्याजवळ जे होते, ते देशाचे आहे आणि माझ्याकडे काय आहे? माझ्याजवळ तुम्ही सर्वजण (कार्यकर्त्यांना उद्देशून) आहात. माझा पक्ष कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझ्याजवळ जे काही होते, ते इतरांना देऊन टाकले असे उद्गार मुलायम यांनी यावेळी काढले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!