|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुख्यमंत्री पंजाबमधीलच असेल : केजरीवालमुख्यमंत्री पंजाबमधीलच असेल : केजरीवाल 

kejriwal

आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचा दावा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

 मनीष सिसोदियांच्या एका वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल यांना पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनविण्याच्या चर्चेवर स्वतः दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंजाबचा मुख्यमंत्री पंजाबमधीलच असेल. जनतेला जी आश्वासन देण्यात आली आहेत, मुख्यमंत्री कोणीही असो, आश्वासने पूर्ण करविण्याची जबाबदारी आपली असेल असे वक्तव्य केजरीवालांनी केले.

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पंजाबचा मुख्यमंत्री पंजाबचाच असेल का असे विचारतात. पंजाबचा मुख्यमंत्री पंजाबचाच असेल, पाकिस्तान किंवा लंडनचा का असेल? मला दिल्लीवासीयांनी जबाबदारी सोपविली आहे. मी दिल्लीचा मुख्यमंत्री आहे, पंजाबच्या जनतेला देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल. मादक पदार्थांचा पुरवठा एक महिन्यात बंद करण्याचे आश्वासन मी दिले आहे आणि ते पूर्ण होईल. 6 महिन्यात मादक पदार्थांचे बळी ठरलेल्या युवकांवर उपचार केले जातील असा दावा केजरीवालांनी केला. सिसोदियांनी वक्तव्य केल्यानंतर बादल कुटुंबीयांची, मजीठिया आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांची झोपच उडाली आहे. मी दिल्लीचा मुख्यमंत्री असल्याने पंजाबचा मुख्यमंत्री बनू शकत नाही असे त्यांना सांगू इच्छितो. दिल्लीची जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन असे केजरीवालांनी यावेळी म्हटले.

Related posts: