|Wednesday, August 2, 2017
You are here: Home » क्रिडा » इस्नेर, सॉक, मार्कोस विजयी, ऍगट-फेररची माघारइस्नेर, सॉक, मार्कोस विजयी, ऍगट-फेररची माघार 

वृत्तसंस्था/ ऑकलंड

येथे सुरू असलेल्या एटीपी ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेत दुखापती, आजारपण व धक्कादायक निकाल यामुळे बुधवारी अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर पडले. अग्रमानांकित रॉबर्टो बॉटिस्टा ऍगट तसेच डेव्हिड फेरर यांनी माघार घेतली.

सहाव्या मानांकित फेलिसियानो लोपेझनेही प्रतिस्पर्ध्याला सामना बहाल केला तर जॉन इस्नेर व मार्कोस बॅघडॅटिस यांना दुसऱया फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. चौथ्या मानांकित अमेरिकेच्या जॅक सॉकने मात्र सफाईदार प्रदर्शन करीत आपल्याच देशाच्या रेयान हॅरिसनवर 7-6 (7-5), 4-6, 6-1 अशी मात केली. स्पेनचा रॉबर्टो ऍगट हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून पोटदुखीमुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. त्याचाच देशवासी तिसऱया मानांकित फेररला हॉलंडच्या रॉबिन हॅसकडून पराभव स्वीकारावा लागला. सहाव्या मानांकित लोपेझने पाठदुखीमुळे माघार घेतली. दुसऱया मानांकित इस्नेरने टय़ुनिशियाच्या मॅलेक जॅझिरीला 6-3, 3-6, 7-6 (8-6) असे नमविले तर आठव्या मानांकित बॅघडॅटिसने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनवर 4-6, 7-6 (7-4), 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!