|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » व्यापारासाठी जी.एस.टी.आणि डिजिटिल पेमेंटला पर्याय नाहीव्यापारासाठी जी.एस.टी.आणि डिजिटिल पेमेंटला पर्याय नाही 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जेसटी करप्रणाली पूर्णपणे कागदविरहित आणि तंत्रज्ञानावर आधारित असून व्यापार पध्दतीत बदल होत आहे. यामुळे भविष्यात व्यापार करण्यासाठी व्यापाऱयांना जी.एस.टी बरोबर डिजिटल पेमंटचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी केले. अर्थव्यवस्थतेतील बदलाचा व्यापार उद्योगावरील परिणाम  या  विषयावर व्यापाऱयांना मार्गदर्शन करताना खंडेलवाल बोलत होते.

नव्याने येऊ घातलेल्या जी.एस.टी.करप्रणालीची माहिती व तंत्रज्ञानाचा व्यापार उद्योगातील आवश्यक वापर याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि गुडस सर्व्हिस  टॅक्सची व्यापारी उद्योजकांना माहिती होण्यासाठी दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंन्झ्युमर प्रॉडक्टस डिसट्रिब्युटर्स असोसिएशन  व चेंबर ऑफ कॉमर्स  ऍन्ड इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत  कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी व्यापारी व उद्योगजकांना मार्गदर्शन केले. खंडेलवाल म्हणाले, सध्या व्यापाराचे तंत्र व पध्दत बदलत असून व्यापाऱयांनाही बदलावे लागेल. डिजिटायझेशन झाले नसते तर डिजिटल पेमेंट आले नसते. भविष्यात व्यापारात चेक व आणि रोखीने व्यवहार होणार नाहीत. व्यापारासाठी जी.एस.टी.करप्रणालीत येण्याबरोबर डिजिटल पेमेंटचा वापर करावा लागेल. आतापर्यंत देशातील 20 लाख व्यापाऱयांना डिजिटल पेमेंटचे तंत्र समजावून सांगण्यात आले आहे. जी.एस.टी. आणि डिजिटल पेमेंटचे व्यापाऱयांना फायदेही असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले. व्यापाऱयांना कराचा परतावा आर.टी.जी.एस.मधून मिळणार आहे. तसेच डिजिटल पेमेंटमुळे सरकारकडून पॉईंट मिळणार असून याचा फायदा करातून सूट मिळण्यासाठी होणार आहे.

चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आनंद माने  म्हणाले, सद्या देशात अस्थिरतेचे वातावरण आहे. लहान व्यापाऱयांना मोठय़ा व्यापाऱयांशी स्पर्धा करावी लागत असून याची लहान व्यापाऱयांना चिंता लागली आहे. यावेळी फिक्कीचे संचालक ललित गांधी, महाराष्ट्र राज्य कंझ्युमर प्रॉडक्टस डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जी.स.टी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्येमध्ये बदल करण्याची गरज असून याबाबत टॅली सॉफ्टवेअरच्या पदाधिकाऱयांनी माहिती दिली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेला संजयकुमार पाटील, विजय नारायणपुरे, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष दिपक शहा,  प्रशांत शिंदे, अतुल दोशी, प्रदीप कापडिया यांच्यासह व्यापारी उद्योजक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक दीपक शहा यांनी केले. आभार प्रशांत शिंदे यांनी मानले.A

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!