|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शहीद जोशिलकर यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरणशहीद जोशिलकर यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

लिंगनूर क।। नूल येथे शहीद जवान सुनिल जोशिलकर यांच्या अर्धपुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. 109 मराठा इन्फंट्रीचे कॅप्टन बीपीनकुमार यांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी सैनिक लक्ष्मण खांडेकर तर तहसिलदार राजेश चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

सुरूवातीस वीरपत्नी संध्या जोशिलकर यांचा ग्रामस्थांतर्फे साडीचोळी देऊन छाया चोथे व संगिता भरगुडा यांच्या हस्ते गौरव तर कॅप्टन बीपीनकुमार यांच्या हस्ते वीरपिता शंकर व वीरमाता हौशाबाई यांचा सत्कार झाला. तहसिलदार चव्हाण, बीपीनकुमार, चंद्रहार पाटील, धोंडीबा हळदकर, श्री. खांडेकर यांची भाषणे झाली. आजी-माजी सैनिकांनी पुतळा बांधकामासाठी आर्थिक मदत तर पुतळा उभारणीसाठी स्मारक समिती सदस्य व अशोक चोथे, श्रीकांत कुरळे, जयसिंग कुरळे, राजू जोशिलकर, अशोक रोटे यांनी परिश्रम घेतले.

शहीद जेशिलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त जोशिलकर कुटुंबियांनी प्राथमिक शाळेच्या ग्रंथालयास 2500 रूपयांची पुस्तके भेट दिली. शहीद जवान सुनिल जोशिलकर यांच्या नावे यंदापासून देण्यात येणारा बेस्ट जवानाचा पुरस्कार प्रविण कोरे याला देऊन गौरविण्यात आले. पुतळय़ाच्या विद्युतीकरणासाठी साई मूकबधीर निवासी शाळेच्या शिक्षकांनी देणगी दिली.

कार्यक्रमास सरपंच निजाम मुल्लाणी, उसपरपंच विजय भुरगुडा, संजय जोशिलकर, शिवाजी पाटील, रावसाहेब पाटील, हसूरचंपूचे माजी सरपंच काकडे, पोलीसपाटील मारूती संकपाळ, तानाजी कुरळे आदींसह पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. धनंजय जोशिलकर यांनी आभार मानले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!