|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ातील पाणी योजनांची आवर्तने पुर्वनियोजित वेळापत्रकानुसारः संजयकाका पाटीलजिल्हय़ातील पाणी योजनांची आवर्तने पुर्वनियोजित वेळापत्रकानुसारः संजयकाका पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

टेंभू, ताकारी, म्हैशाळ योजनांच्या थकीत विज बिलाबाबत ठोस निर्णय घेवून त्या योजना कार्यान्वित करून पुर्व नियोजित वेळापत्रकानुसार आवर्तने चालु करण्याविषयी खासदार संजयकाका पाटील यांनी मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही आवर्तने वेळेत सुरू होतील असे आदेश दिले आहेत.

जिल्हय़ातील टेंभू, ताकारी व म्हैशाळ या तिन्हीही योजना शेतीसाठी व दुष्काळीभागासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे या योजनांची आवर्तने वेळेत होणे अतिशय गरजेचे आहे. ही आवर्तने सुरू करण्यासाठी थकीत वीज बिलांचा मोठा अडसर होता. पण देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे ही आवर्तने वेळेत सुरू होती असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्यानुसार महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी याठिकाणी वेळेत वीजपुरवठा करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हय़ात ही आवर्तने वेळेत सुरू होतील असे संजयकाका पाटील यांनी सांगितले.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!