|Sunday, July 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत 17 जानेवारीला संविधान मोर्चासांगलीत 17 जानेवारीला संविधान मोर्चा 

प्रतिनिधी/ मिरज

जिह्यातील अनुसुचित जाती-जमाती, बौध्द, भटके विमुक्त, मुस्लिम, अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने मंगळवारी 17 जानेवारी रोजी संविधान सन्मान महा मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार असल्याची माहिती रिपाइं जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, उपाध्यक्ष प्रकाश इनामदार आणि युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे यांनी दिली.

ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, ओबीसींना 52 टक्के आरक्षण देण्यात यावे, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, मराठा आरक्षण देताना एससी, एसटी, एनटी, ओबीसी व अन्य मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये बदल करु नयेत, अशा अनेक मागण्यांसाठी सदरचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी जिह्यात जोरदार तयारी सुरू झाली असून, सर्वत्र जनजागृती मोहिम राबविली जात आहे. संविधानची सुरूवात महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात येणार आहे. सदरच्या मोर्चात सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जगन्नाथ ठोकळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!