|Tuesday, August 1, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बहर’ युवा महोत्सव 12 रोजीपासून बहरणार!‘बहर’ युवा महोत्सव 12 रोजीपासून बहरणार! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

जयहिंद प्रतिष्ठान आणि युवा सेना आयोजित, आमदार उदय सामंत पुरस्कृत ‘बहर’ युवा महोत्सव 12 ते 15 जानेवारी दरम्यान रंगणार आहे. हॉटेल विवेकमागील मराठा मैदानावर दररोज सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत ‘बहर’ बहरणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांतील चुरस यामध्ये पहायला मिळणार असून ‘बेस्ट कॉलेज’चा किताब कोण पटकावणार याबाबतही उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘बहर’च्या प्राथमिक फेऱया नुकत्याच पार पडल्या असून यातून स्पर्धकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

12 जानेवारी रोजी ‘सोलो डान्स’ने ‘बहर’चा शुभारंभ होणार आहे. प्राथमिक फेरीत एकूण 42 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यातून अंतिम 21 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये सुकन्या निमकर, प्रतिक्षा शिंदे, ऋतुजा यादव, ममता आंबेकर, अपेक्षा सावंतदेसाई, सायली राऊत, मृणाली दवंडे, गौरी सुर्वे, दीक्षा आंबोळकर, गौरी साबळे, शुभम नंदानी, पूजा कोरगावकर (गो.जो.), ऐश्वर्या आखाडे (गांगण ज्यु. कॉ.), चंद्रकला कनोडिया, आदिल फोडकर, स्वाती फुणगुसकर (नवनिर्माण), ऋत्विक सनगरे (अभ्यंकर-कुलकर्णी), रक्षंदा सावंत (जी.पी.आर.), स्वप्नील धनावडे, शुभम् नंदानी (विजू नाटेकर कॉ.) या स्पर्धकांची अंतिम फेरीत निवड झाली आहे. सोलो डान्स प्राथमिक फेरीसाठी प्रथमेश साळवी, अमित कदम, किरण कामतेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

13 जानेवारी रोजी गीतगायन स्पर्धा रंगणार आहे. प्राथमिक फेरीमध्ये एकूण 52 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यातून 14 स्पर्धकांची अंतिमसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेत सौरभ सावंत, महम्मद सोलकर, विराज करंदिकर, जीवन काशिदे, सतिश राठोड, निहाली गदे, नेत्रा आगाशे, स्नेहल लिंगायत, वरदा संसारे, श्रीनिधी सावंत, शिवानी शिंदे, मंजिरी काणे, प्रिया कांबळे, श्वेता चव्हाण यांची अंतिम फेरीत निवड झाली आहे. गीतगायन प्राथमिक फेरीसाठी अभिजित नांदगावकर, ओंकार बंडबे यांनी परिक्षक म्हणून काम पािहले.

14 रोजी पर्सनॅलिटी काँटेस्ट होणार असून प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत प्रत्येकी 13 मुला, मुलींची निवड करण्यात आली. मुलींत ‘मानसी कळंबटे, सिरीन मन्सूर काझी, कार्तिकी पिलणकर, सोनल माचिवले, अश्विनी मायंगडे, आशा कांबळे, नेहा राजवाडकर, ऐश्वरी सुर्वे, तृप्ती सुतार, मेघा दरेकर, दिव्या आंबुलकर, आसावरी आखाडे, श्रेया वांदरकर’ यांची निवड झाली आहे. तर मुलांमध्ये ‘मिहिर सुर्वे, सुलतान काझी, ऋत्विक सनगरे, सैफत मुन्वर म्हसकर, नंदकिशोर रसाळ, शशांक शिंदे, अभिलाष सुर्वे, झोहेब मुकादम, आशुतोष सावंत, ओम जवंजाळ, ऋषिकेश जाधव, ओंकार सागवेकर, फरहान कापडे’ यांची निवड झाली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी डॉ. अनुराधा लेले व हेमंत वणजू यांनी काम पाहिले.

तर 15 जानेवारी रोजी ग्रुप डान्स स्पर्धा होणार असून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत 18 ग्रुप्स सहभागी झाले होते. त्यातून 11 ग्रुप्सची निवड करण्यात आली. ग्रुप डान्स स्पर्धेनंतर पारितोषिक वितरण होणार आहे. ग्रुप डान्समध्ये ‘डि-अन्नोन व्हायरस (अभ्यंकर-कुलकर्णी), शिवानी ऍण्ड ग्रुप (गांगण कॉ.), मोरया ग्रुप (गो.जो.), कला संस्कृती ग्रुप (गो.जो.), नटरंग ग्रुप (गो.जो.), सी.के. ग्रुप (नवनिर्माण), चंद्रकला ग्रुप (नवनिर्माण), आर.व्हि.एस. ग्रुप (नवनिर्माण), एफ.डि.सी. ग्रुप (अभ्यंकर कुलकर्णी), एस.आर.के. ग्रुप (विजु नाटेकर कॉ.) यांची निवड झाली आहे.

‘बहर’ युवा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी दिल से ग्रुप, प्रारंभ ग्रुप, आकार डान्स ऍपॅडमी, किरण डान्स ऍपॅडमी यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच परिश्रम प्रथमेश साळवी, प्रज्ञेश रेडिज, नंदकिशोर जुवेकर, तुषार साळवी, किरण कामतेकर, अविनाश पावसकर, अभि शेटय़े, मयुरेश भट हे यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. तरी ‘बहर’ युवा महोत्सवाला सर्व महाविद्यालयांतील युवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!