|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » Top News » सरकारच्या धोरणांमुळे नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश : दानवे

सरकारच्या धोरणांमुळे नगरपालिका निवडणुकीत भाजपला यश : दानवे 

ऑनलाईन टीम / ठाणे :

राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारने राबवलेल्या धोरणांमुळे मिळाल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज ठाण्यात घेण्यात आली. त्यावेळी दानवे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील अन्य नेते या बैठकीला उपस्थित होते. दानवेंनी नगरपालिका निवडणुकीत भाजपने जे यश मिळवलेले आहे, या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचे जवळपास 72 नगराध्यक्ष आणि 1200 नगरसेवक निवडणून आले आहेत, हे कार्यकर्त्यांचे यश आहे, असेही दानवे म्हणाले.

Related posts: