|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » भुजबळांना व्हीआयपी ट्रिटमेंट ; डॉ. लहाने दोषी

भुजबळांना व्हीआयपी ट्रिटमेंट ; डॉ. लहाने दोषी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याबद्दल जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

छातीत दुखू लागल्याने काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांना जे. जे. रुग्णालयातून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यादरम्यान, डॉ. लहाने यांच्या शिफारशीमुळे छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रिटमेंट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. याबाबत दमानिया यांनी पीएमएलए न्यायालयात याचिका दाखल केली होती. यादरम्यान डॉ. लहाने यांनी आपली बाजू मांडली.

मात्र, न्यायालयात डॉ. लहाने यांना आपली बाजू योग्यपणे मांडता न आल्याने या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने डॉ. लहाने यांना दोषी ठरवले.

Related posts: