|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » सानिया-स्ट्रायकोव्हाला उपजेतेपद

सानिया-स्ट्रायकोव्हाला उपजेतेपद 

वृत्तसंस्था/ सिडनी

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची झेकची साथीदार बार्बरा स्ट्रायकोव्हाला अपिया सिडनी इंटरनॅशनल स्पर्धेत उपजेतेपदावर समाधान मानावे लागले. शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत रशियाच्या टिमिया बाबोस व ऍनास्थिया या जोडीने इंडो-झेक जोडीला 6-4, 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे नव्या वर्षातील सलग दुसरे जेतेपद जिंकण्याचे सानियाचे स्वप्न भंगले. गत आठवडय़ात सानियाने अमेरिकन बेथानीसोबत ब्रिस्बेन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. आता सानिया पुढील आठवडय़ात सुरु होणाऱया ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत बार्बरा स्ट्रायकोव्हासोबत दुहेरीत सहभागी होणार आहे.