|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » विज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

विज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल 

ऑनलाईन टीम / करनाल :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना खादी आणि भारतीय मुद्राबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज पुनिया यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर राष्ट्रपिता महात्मा गांधीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रसिद्ध झाला. त्यानंतर विज यांनी खादीचा खप हा महात्मा गांधींमुळे नव्हे तर मोदींमुळे वाढला असल्याचे वक्तव्य केले. तसेच महात्मा गांधींना आता नोटेवरुनही हटवणार असल्याचे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुनिया यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Related posts: