|Sunday, March 24, 2019
You are here: Home » Top News » आता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा

आता 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

येत्या 31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा समाजाचा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून आता 6 मार्चला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली.

राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असताना मुंबईत मराठा समाजाच्या वतीने येत्या 31 जानेवारीला मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आज झालेल्या मराठा मोर्चाच्या आयोजकांच्या बैठकीत हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून आता 6 मार्चला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच 31 जानेवारीला राज्यभरात चक्काजाम करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आली.

Related posts: