|Monday, November 19, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » खोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम

खोटय़ा बातम्यांना फेसबुक देणार पूर्ण विराम 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

सोशल मिडीयावर आधिराज्य असलेले फेसबुकने जर्मनीत खोटय़ा बातम्यांना पूर्ण विराम देण्यासाठी उपाय सुरू केले आहेत. जर्मनीत या वर्षी निवडणुका होणार असून हा देश खोटय़ा बातम्यांवर आगर झाला आहे,असे विश्लेषकांनी म्हटले आहे.

जर्मन भाषेतील सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा पहिला उपाय फेसबुकने रविवारी जाहीर केले. ‘या समस्येवर उपायबाबत आम्ही काळजीपूर्वक काम करत आहोत. स्पॅमर्सनी प्रसिध्द केलेल्या खोटय़ा बातम्यांवर आमचे प्रयत्न केंदीत आहेत. वस्तुनिष्ठ, पूर्वग्रहदूषित बातम्यांकरीता आम्ही तिसऱया पक्षांनाही समाविष्ट करून घेतले आहे’, असे फेसबुकने निवेदनात म्हटले आहे. या उपक्रमांतर्गत संशयित बातमी निदर्शनास आणून देणे आधिक सोपे होणार आहे.

Related posts: