|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » जुन्या नोटांच्या तुलनेत 45 टक्के नव्या नोटा चलनात

जुन्या नोटांच्या तुलनेत 45 टक्के नव्या नोटा चलनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सरकारने 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 ला घेतला होता. यानंतर 500 आणि 2000च्या नव्या नोटा चलनातून परत घेतल्यानंतर या जुन्या नोटांच्या तुलनेत चलनामध्ये फक्त 45 टक्के रक्कम असल्याचा खुलासा झाला आहे.

रिझर्व ब्ँंाकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदीय माहिती देताना सांगितलं होतं की 15.44 लाख कोटींच्या जुन्या नोटा सरकारकडे जमा करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत 9.2 लाख कोटींच चलन उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हणजेच नोटाबंदी नंतर 60 टक्के नवे चलन बाजारात आणण्यात आले आहे. 13 जानेवारीला रिझर्व बँकेने सांगितले की 9.5 लाख कोटींची रक्क्म चलनात आहे. यामध्ये नोटाबंदीच्या पूर्वीची म्हण्जेच छोटय़ा रकमेच्या नोटांच्या स्वरूपातील 2.56 लाख कोटींची रक्कमही सामील आहे.