|Friday, April 20, 2018
You are here: Home » Top News » हिंदुत्ववाद्यांसाठी जलिकट्टू एक धडा ; ओवेसींचे वादग्रस्त वक्तव्य

हिंदुत्ववाद्यांसाठी जलिकट्टू एक धडा ; ओवेसींचे वादग्रस्त वक्तव्य 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सुप्रीम कोर्टाने जलिकट्टूवर टाकलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूचे वातावरण सध्या तापलेले दिसत आहे. राज्यभरातून सर्वच स्तरातील लोकांपासून नेते, अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता या वादात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली असून हिंदुत्ववाद्यांसाठी हा एक धडा असल्याचे वादग्रस्त वक्तव्य ट्विट त्यांनी केले आहे.

ट्विटमध्ये त्यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे केला आहे. ‘जलिकट्टूबाबत होत असलेली निदर्शने ही हिंदुत्ववाद्यांसाठी एक धडा आहे. समान नागरी कायदा या देशावर थोपवला जाऊ शकत नाही. कारण येथे एकच संस्कृती नाही. आम्ही सर्व समाजाचे सण साजरा करतो’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

Related posts: