|Sunday, April 22, 2018
You are here: Home » Top News » तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी

तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व : मोदी 

ऑनलाईन टीम /तमिळनाडू :

सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूचे पारंपारिक खेळ असलेल्या जलिकट्टूवर बंदी आण्ल्याच्या विरोधात तमिळनाडूची जनता रस्त्यावर आली. या खेळाच्या समर्थनार्थ जोरदार अंदोलन सुरू असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तमिळनाडूच्या संस्कृतीवर गर्व असल्याचे म्हटले आहे.

मोदींनी आज ट्विट करताना म्हटले की, नागरिकांच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सार्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकार तमिळनाडूच्या विकासाठी कटाबध्द आहे.

केंद्र सरकारने जीलकट्टूच्या समर्थनार्थ तमिळनाडू सरकारने मंजुर केलेल्या अध्यादेश मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी याच मागणीवरून मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असून , बैलाला आता कसरती करणाऱया प्राण्यांच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे.

Related posts: