|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » एमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका

एमआयएम लढवणार चार महापालिकांच्या निवडणुका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एमआयएम या पक्षाने राज्यातील आगामी चार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या चार महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार देणार आहे. मुंबईतील 50 ते 60 जागांसाठी, पुण्यातील 40 जागांसाठी, पिंपरी-चिंचवडमध्ये 25 जागांसाठी आणि सोलापुरात 40 ते 50 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असल्याची तयारी एमआयएमने केली आहे.