|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सत्तेवर आल्यास ड्रग माफियांना तुरूंगात टाकूः सिसोदिया

सत्तेवर आल्यास ड्रग माफियांना तुरूंगात टाकूः सिसोदिया 

चंडीगढ

 पंजाबमध्ये ‘आप’ सत्तेवर आल्यास सध्या देण्यात राजकारण्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत नेमण्यात आलेल्या हजारो पोलिसांना अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तैनात केले जाईल अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.

पंजाब पोलीस दलातील हजारो जवानांना नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत तैनात करण्यात आले आहे. जर आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास ही सुरक्षाव्यवस्था त्वरीत हटवण्यात येईल. अंमली पदार्थ पुरवठा साखळी उद्ध्वस्त करत माफियांना तुरूंगात डांबण्याच्या कामास त्यांना लावण्यात येईल असे सिसोदिया यांनी सांगितले. पंजाबमध्ये एका राजकीय बैठकीला संबोधित करताना त्यांनी अकाली दलाचे माफियांशी असलेल्या संबधांबाबत जोरदार टीका केली. यावेळी दिल्लीमधील आप सरकारने केलेल्या कामाची माहिती देताना दिल्लीचे वीज दर देशातील सर्व राज्यांपेक्षा कमी आहे. वीज पुरवठा करणाऱया कंपनीतील भ्रष्टाचार संपविल्यामुळेच हे शक्य झाल्याचा दावा त्यांनी केला

. असे सांगत सत्तेवर आल्यास पंजाब मध्येही अशाच प्रकारे काम करण्यात येइल  असे आश्वासनही सीसोदिया यांच्याकडून यावेळी आश्वासन देण्यात आले.