|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नगरपरिषदेने पलूस बाजार पेठेत लावली शिस्त

नगरपरिषदेने पलूस बाजार पेठेत लावली शिस्त 

प्रतिनिधी/ पलूस

पलूस आठवडी बाजारात भाजी विक्री करणाऱया व्यापाऱयांना आज पलूस नगरपरिषदेने प्रातिनिधीक स्वरूपात शिस्त लावली. अस्थाव्यस्थ व बेशिस्तपणे बसून भाजी विक्री करणाऱया व्यापाऱयांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होत होती. याला शिस्त लावण्यासाठी नगराध्यक्ष राजाराम सदामते, उपनगराध्यक्ष विक्रम पाटील, गटनेते सुहास पुदाले यांनी स्वतः उपस्थित राहून बाजारपेठेत मापे घेवून आखणी केली.

मंगळवार हा पलूसचा आठवडी बाजार दिवस आहे. यावेळी येथे पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, रामानंदनगर, कुंडल याभागातील शेतकरी, व्यापारी भाजीपाला व्यसाय करण्यासाठी येतात. मोठया प्रमाणात भाजी खरेदीसाठी गर्दी होत असते. सकाळी दहा वाजले पासून ते रात्री आठ वाजेपर्यत या परिसरात बाजार भरत असल्या कारणाने वाहतुक कोंडी मोठया प्रमाणात होत असते. या ठिकाणी अनेकवेळा किरकोळ अपघात झाले आहेत. बाजार दिवशी बाहेरील व्यापारी व शेतकरी रस्त्याच्या कडेलाच बसून व्यापार करीत असतात. त्याचबरोबर एका बाजूला चहा, वडापावचे हात गाडेही बाजार दिवशी खास करून उभा असतात. या सर्व व्यापाऱयांना एक प्रकारची शिस्त लावणे गरजेचे होते. तो आज दिवस उजाडला गटनेते सुहासराव पुदाले, नगराध्यक्ष राजाराम सदामते, उपनगराध्यक्ष विक्रम पाटील, संदीप सिसाळ यांनी पुढाकार घेवून बाजारात पहिल्यांदा योग्यपध्दतीने आखणी करून घेतली आहे. पलूस नगरपरिषदेने बाजार परिसरात शिस्त लावण्याचा घेतलेल्या निर्णयाचे पलूस च्या नागरीकांनी स्वागत केले. परंतु याच परिसारत स्वच्छतागृही असावे अशी मागणी केली. पावसाळयात पाणी साठून राहिल्याने व्यापाऱयांना बसण्यास अडचणी निर्माण होतात. त्यासाठी मुरूम टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवणे गरजेचे आहे. अशी मागणी येथील महिला व्यापाऱयांनी केली आहे.

पलूस बाजारात मोठी उलाढाल होत असते त्यातून नगरपरिषदेलाही उत्पन्न वाढणार आहे. परंतु नगरपरिषदेनेही त्याठिकाणी पाणी, लाईट, स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रातिनिधीक स्वरूपात ही लावलेली शिस्त पुढे अशीच राहिल की नाही अशी शंका काही व्यापाऱयांनी व्यक्त केली. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मार्गे पलूस नगरपरिषदेस काढावा लागेल. अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होईल.