|Saturday, May 25, 2019
You are here: Home » उद्योग » रोज अर्धा तास बोला मोफत!

रोज अर्धा तास बोला मोफत! 

‘बीएसएनएल’ची नवीन ग्राहकांसाठी योजना : दरमहा 149 रुपये शुल्क निश्चित

प्रतिनिधी/ नवी दिल्ली

खाजगी क्षेत्रातल्या दुरसंचार कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने बीएसएनएलकडून महत्त्वाकांक्षी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. ही योजना खास नवीन प्रिपेड कार्डधारकांसाठी असून, यामध्ये ग्राहकाला दररोज 30 मिनीटे मोफत एसटीडी तसेच स्थानिक कॉल करता येणार आहे. याअंतर्गत अन्य नेटवर्कवरील कॉलचाही समावेश असून त्यासाठी 149 रुपये एवढे मासिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

 एकदाच 439 रुपये भरून तीन महिन्यासाठी लाभ घेण्याचा पर्याय ही ग्राहकांना देण्यात आल्याचे कंपनीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून, ग्राहकांना 300 एमबी डाटा ही या योजनेतंर्गत वापरायला मिळणार आहे. अधिकतर दुरसंचार कंपन्याकडून आपल्या नेटवर्क अंतर्गतच मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात येते.

उत्कृष्ट तसेच किफायतशीर सेवा पुरवण्यात बीएसएनएल कायमच अग्रस्थानी राहिले आहे. त्यानुसार आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनेमध्ये या मोफत कॉलिंग योजनेचाही समावेश झाला आहे. दुरसंचार सेवा क्षेत्रात स्पर्धा असतानाही मार्च 2015 पासून आतापर्यंत कंपनीच्या बाजारपेठेतील हिस्सेदारीत 1 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीचे संचालक अनुपम मिश्रा यांनी सांगितले.

अन्य कंपन्यांच्या ग्राहकांनाही मिळणार लाभ

संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आलेल्या या ‘प्रमोशनल’ योजनेची सुरुवात 24 जानेवारी पासून होणार आहे. नवीन ग्राहकांसह इतर दुरसंचार कंपन्यांच्या ग्राहंकाना मोबाईल क्रमांक पोर्ट करून घेत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा फ्रॅन्चायजीस, किरकोळ विक्री केंद्रासहित कंपनीच्या ग्राहकसेवा केंद्रांमध्ये  उपलब्ध राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Related posts: