|Monday, March 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणातील वीरांगनेच्या हाती ‘विश्व शांती’चा झेंडा!

कोकणातील वीरांगनेच्या हाती ‘विश्व शांती’चा झेंडा! 

दापोलीच्या मेदिनी चव्हाणची भरारी

कोकणातील पहिली महिला मेजर

सुदानमध्ये शांती सेनेत कार्यरत

अरूण आठल्ये / रत्नागिरी

कोकणातील पहिली मेजर बनण्याचा बहुमान मिळवणारी दापोलीतील मेदिनी चव्हाण ही वीरांगना विश्व शांतीचा झेंडा डौलाने फडकावत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये त्या सध्या सुदानमध्ये शांती दूताची भूमिका बजावत आहेत़. हा बहुमान मिळवणारी ती कोकणातील पहिलीच महिला आहे.

भारत हा युनोचा संस्थापक सभासद आह़े निरनिराळ्या प्रदेशात उद्भवणाऱया तंटय़ाचे निराकरण करण्याच्या युनोच्या योजनेचा भारत खंदा समर्थक आह़े स्वातंत्र्यप्राप्तीनंतर युनोच्या शांततेच्या मोहिमेमध्ये आपले मोठे सैन्य पाठवणारे भारत जगातले दुसऱया क्रमांकाचे राष्ट्र आह़े

युनोच्या शांतता राखण्याच्या योजनेमध्ये सैनिकी अधिकाऱयांना फक्त बळाचा वापर करून शांतता राखावयाची नसते, तर आपली सम्यक वृत्ती, शिस्त, जबाबदारी, मानवी जीवनासाठी आदर व त्याचा मानसन्मान या गुणांचा वापर करावा लागत़ो

धाडस, कर्तव्यदक्षता, झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव, दूरदृष्टी, नियोजन आणि कामामध्ये स्वतःचा संपूर्ण सहभाग यासारख्या सद्गुणाच्या बळावर मेदिनीची या युनोच्या आंतरराष्ट्रीय शांती सैन्यामध्ये निवड झाली आह़े त्यात केवळ गुणवत्तेच्या आधारावरच भारतीय सैन्यातील अधिकाऱयाची निवड केली जात़े मेजर मेदिनीने लष्करी सेवेमध्ये पर्वतमय प्रदेशापासून ते वाळवंटापर्यंतच्या आणि काश्मीरसारख्या अतिथंड व संवेदनशील प्रदेशात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आह़े

दहवीपर्यंत शिक्षण दापोलीत

मेदिनीचे दहावीपर्यंतचे शिक्षण दापोली येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाल़े तिने शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध उपक्रमांमध्ये पारितोषिके प्राप्त केल़ी राष्ट्रीय छात्रसेनेतील विशेष नैपुण्याबद्दल पुणे विद्यापीठाने तिचा सन्मान केल़ा अंतराळ शास्त्र या विषयात ती एमएससी करत असतानाच 2007 साली तिची संरक्षणदलात निवड झाल़ी स्टाफ सिलेक्शन बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या देशपातळीवरील परीक्षेत तिने देशात तिसरा क्रमांक पटकावल़ा ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जात़े

सन 2007 पासून अरूणाचल प्रदेशातील टेंगा व्हॅली आर्मी युनिटमध्ये लेफ्टनंट या पदावर कार्यरत असलेल्या मेदिनी यांना 2009 मध्ये पॅप्टनपदी प्रमोशन †िमळाल़े 2013 पासून बारामुल्ला येथे सेवा बजावल़ी 2014 साली मेजरचे प्रमोशन मिळाल़े मेदिनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेलाय़ संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुदान येथील शांतता मोहिमेमध्ये भारतीय लष्कराची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आह़े

चव्हाण कुटुंब तसे रत्नागिरी नजीकच्या शिरगावच़े तिचे वडील मधुकर चव्हाण व आई स़ौ अलका या दापोली कृषी विद्यापीठावर कार्यरत होत्य़ा दोघेही सेवा निवृत्त झाले असून दापोलीतच स्थायिक झाले आहेत़

Related posts: