|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलच्या विकासासाठी ‘मेक इन कागल’

कागलच्या विकासासाठी ‘मेक इन कागल’ 

प्रतिनिधी / सेनापती कापशी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडिया म्हणतात, देवेंद्र फडणवीस मेक इन महाराष्ट्रा , महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणतात मेक इन कोल्हापूर मात्र आपण मेक इन कागल तालुका करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे युवा नेते व शाहू समुहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

लिंगनूर (कापशी) ता. कागल येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नानासो घाटगे होते.

समरजितसिंह घाटगे बोलताना पुढे म्हणाले, कागल तालुक्याचा विकास करण्यासाठी सकारात्मक राजकारण करुन युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. आजपर्यंत तालुक्याच्या पाडापाडीच्या राजकारणात आपल्या गटाचा केवळ उपयोग करुन घेतला. त्यामुळेच आपला गट वाढू शकला नाही, अशी खंत व्यक्त करुन ते म्हणाले केवळ भाजप आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाच्या पध्दतीवर आपण भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, कागलच्या राजकारणात केवळ मांडवलीचे राजकारण झाले असून यापुढेही हेच राजकारण सुरु राहणार आहे. या कारणास्तवच आपण याला फाटा देवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सौ. अश्विनी घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक विकास यादव यांनी केले. कार्यक्रमास शाहूचे व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, बिद्रीचे माजी व्हा. चेअरमन दत्तामामा खराडे, संजय चौगुले, रामचंद्र यादव, नामदेव बापू आवळेकर, प्रशांत घोरपडे, बाबुराव यादव आदी उपस्थित होते. यावेळी           प्रगतशील शेतकरी बापूसो सखाराम पवार व कृष्णात जाधव यांचा सत्कार करण्यात आला. आभार अजित घाटगे यांनी मानले.

Related posts: