|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कराड-बेळगाव रेल्वे मार्गासाठी 700 पत्रांची चळवळ

कराड-बेळगाव रेल्वे मार्गासाठी 700 पत्रांची चळवळ 

प्रतिनिधी / संकेश्वर

बेळगाव-संकेश्वरöनिपाणीमार्गे कराड या 191 कि. मी लांबीच्या रेल्वेमार्गाचा सर्व्हे मध्यरेल्वे पुणे विभागाने केला आहे. तरी केंद्र सरकारने या मार्गास मंजुरी द्यावी, अशी विनंती संकेश्वरातील विविध शैक्षणिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना 700 पत्रे लिहून केली आहे.

संकेश्वरात रेल्वेची मागणी जुनी आहे. यासाठी नगरपालिकेने या मागणीचा ठराव केला आहे. मागणीच्या पुर्ततेसाठी चळवळीचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांची पत्रे महत्त्वाची आहेत. या पत्राच्या माध्यमातून हा रेटा सुरू करण्यासाठी शहरातील विविध शाळांना विलास घोरपडे यांनी संपर्क साधून शालेय मुलांना रेल्वे मंत्रीमहोदयांना पत्रे पाठविण्याचे आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर शालेय मुलांनी पोस्ट कार्डवर कन्नड, इंग्रजी, उर्दू, मराठी, हिंदी भाषेत पत्रे लिहली आहेत. याकामी स्वामी विवेकानंद कन्नड मिडीयम स्कूल, अक्कमहादेवी कन्या शाळा, सरकारी उर्दू हायस्कूल, हिरण्यकेशी मराठी विद्यानिकेतन, एस. एस. पाटील खातेदार, इंग्लीश मिडीयम स्कूल, सीबीएससी स्कूल, एस. डी. हायस्कूल, प्राथमिक मराठी सरकारी शाळा आदी शालेय मुला मुलींची 700 हून अधिक पत्रे रेलमंत्री सुरेश प्रभुंना पाठविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ज्येष्ठ अडत व्यापारी गंगाधर मास्तोळीमठ (वय 90) यांनीही मोडीभाषेत पत्र लिहून या चळवळीला बळकटी दिली आहे.

Related posts: