|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरे स्थान

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरे स्थान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळय़ात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अरूणाचल प्रदेशच्या चित्ररथाने पहिले स्थान तर त्रिपुराच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

प्रजासत्तकदिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळय़ात सहभागी झालेल्या महाराष्ट्रासह 17 राज्यांचे व केंदीय मंत्रालयाचे सहा असे एकंदर 23 चित्ररथ सहभागी झाले होते. राजपथावर झालेल्या संचलनात यंदा महाराष्ट्राकडून लोकमान्यांच्या जीवनकार्याच वेध घेणारा चित्ररथ सादर करण्यात आला होता. प्रसिध्द कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी या चित्ररथाची संकल्पना मांडली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 40 कलाकारांनी हा देखणा चित्ररथ उभारला होता. लोकमान्य टिळकांच्या 160व्या जयंती निमित्त या चित्ररथाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयमी व्यक्तिमत्वाला आणि स्वांतत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला होता. ‘मराठा’ व ‘केसरी’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातुन लोकमान्यांनी केलेली जनजागृती, ब्रिटीश राजवटीविरोधात केलेला संघर्ष इत्यादी बाबी या रथाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या होत्या.

Related posts: