|Thursday, June 27, 2019
You are here: Home » leadingnews » भाजपची औकात 21 फेब्रुवारीला दाखवू : मुख्यमंत्री

भाजपची औकात 21 फेब्रुवारीला दाखवू : मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शिवसेनेने युती करायचे नाही हे आधीच ठरवले होते. आम्हाला पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा अजेंडा घेऊन युती करायची होती. मात्र, हे शिवसेनेला मान्य नसल्यानेच शिवसेनेने भाजपशी युती तोडली. त्यामुळे भाजपची औकात काय आहे ते 21 फेब्रुवारीला निवडणुकीच्यावेळी दाखवू, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

गोरेगाव येथे आयोजित भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधत ते म्हणाले, मागील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 65 जागा लढवल्या होत्या. मात्र, आता शिवसेनेकडून 60 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. मागील निवडणुकीपेक्षा भाजपची ताकद आता वाढली असल्याने भाजपने जास्त जागांची मागणी केली. मात्र, शिवसेनेला आमचा पारदर्शकतेचा अजेंडा मान्य नसल्यानेच युती तोडली.

आम्ही जुगलबंदी, मनोरंजन करणारे नाही तर भ्रष्टाचारबंदी, नोटाबंदी करणारे आहोत. परिवर्तन तर होणारच. या लढाईत आम्ही विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.