|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि प्रशासकांची नियुक्ती केली आहे. माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर रामचंद्र गुहा, माजी महिला क्रिकेट खेळाडू डायना एल्डजी, विक्रम लिमये यांची बीसीसीआयच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीकडून बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायलायकडून कुणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विनोद राय यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.

Related posts: