|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरि÷ आपल्यावर कामाची जबाबदारी टाकतील. राजकीय क्षेत्रात गुरुवारी व शुक्रवारी मतभेद निर्माण होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात अनोळखी व्यक्तीवर विसंबून राहू नका. विश्वास  टाकू नका. परीक्षेसाठी काळजीपूर्वक चौफेर अभ्यास  करा.


वृषभ

नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. मात्र क्षुल्लक चूक संभवते. गैरसमज होई&ल. गुंतवणूक करताना व करार करताना या आठवडय़ात काळजी घ्या. घरगुती अडचणीमुळे व्यवसायातील विस्तार कसा करावयाचा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे जास्त  लक्ष द्यावे. प्रवासाचे बेत आखले जातील.


मिथुन

या आठवडय़ात वेगळय़ा स्वरुपाचे अनुभव येतील. तुमच्या विचारांची दिशा बदलण्याची शक्मयता आहे. शेतीच्या कामात वाडवडिलांचे अनुभव तुम्ही उपयोगात आणा. नोकरी-व्यवसायात अडचणी निर्माण होऊ शकतात. शनिवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. मानसिक शारीरिक त्रास होईल. संयमी धोरण ठेवण्याचा प्रयत्न करा.


कर्क

विचार व कृती यांचा योग्य मेळ घालावा लागतो. नव्या कार्यास आरंभ करता येईल. कलाकारांना काम मिळेल. क्रीडाक्षेत्रात संधीचा उपयोग करता येईल. मंगळवार, बुधवार व्यवसायात खचून न जाता धोक्मयावर लक्ष ठेवल्यास मोठे यश मिळेल. प्रेमात झालेल्या चुका सुधारता येतील. त्यामुळे पुढील जीवनात फसगत होण्याचे टळेल.


सिंह

या आठवडय़ात व्यवसायात एखादे मोठे काम मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीत बदल संभवतो. साहित्याला प्रसिद्धी मिळेल. पुरस्कार व आर्थिक लाभ होईल. यंदाचा काळ तुम्हाला उत्साह व पैसा देणार आहे. गुरुवारी  व शुक्रवारी प्रकृतीची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने परिक्षेत मनाची एकाग्रता जास्त  ठेवावी.


कन्या

या आठवडय़ात गुंतवणूक करताना सावध रहा. पेचात टाकणारी घटना घडेल. घरगुती तणाव निर्माण होईल. कलाक्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना परदेशी जाण्याची संधी येईल. विशेष काम तुमच्याकडून होईल. शुक्रवार व शनिवार राजकीय क्षेत्रात गुप्तहित शत्रूंचा  त्रास संभवतो. मोठी आश्वासने देऊ नका. प्रवासात सावध रहा.


तूळ

आठवडय़ाच्या सुरुवातीला घरगुती जीवनात काही वादळे निर्माण होऊ शकतात. प्रकृतीची  काळजी घ्या. नोकरीत व धंद्यात प्रगती संभवते अडचणी कमी होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्या भूमिकेला  महत्त्व येईल. लोकसंग्रह वाढेल. परिक्षेत जास्त प्रयत्न केल्यास विद्यार्थी उच्चांक गाठू शकतील. नव्या चित्रपट क्षेत्रात नावलौकिक वाढेल.


वृश्चिक

साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. काही आर्थिक अडचणी येतील. पण मार्ग सापडेल. कला क्रीडा क्षेत्रात प्रकृतीची काळजी घ्या. दु:खापतीमुळे एखादी संधी हुकण्याची शक्मयता आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करताना समोरची व्यक्ती आपल्या विश्वासातील आहे का  ती खात्री करा. शेअर्स उलाढालीत फायदा संभवतो. शेतीच्या कामात  यश मिळेल.


धनु

राजकारणात काही चढउतार आले तरी आपण आपल्या चातुर्याने त्याला  चांगली बगल देऊ शकाल. या आठवडय़ात वाद, गैरसमज होण्याची शक्मयता आहे. नोकरीत  कामाचा व्याप वाढेल. काही सहकाऱयांच्या दिरंगाईमुळे कामे रेंगाळत पडतील. कोर्टकेसमध्ये गुरुवार, शुक्रवार चिंता निर्माण होऊ शकते. संसारात जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. कमी खा पण चांगले खा.  


मकर

तुमच्या राशीत बुध प्रवेश व चंद्र गुरु त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न सत्कारणी लागतील. राजकीय- सामाजिक कार्याला दिशा मिळेल. जवळचेच दूर गेलेले लोक तुमच्या समवेत येण्याचा विचार करतील. कोर्टकेसमध्ये मंगळवार, बुधवार, सावध रहा. घरातील तणाव व  समस्या कमी होईल. नोकरी-धंद्यात प्रगतीची संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्राला पुढचा मार्ग मिळेल.


कुंभ

तुम्ही घेतलेल्या श्रमाचे श्रेय दुसऱया क्यक्तीला मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीत बुध प्रवेश व चंद्र शुक्र त्रिकोणयोग होत आहे. कुटुंबात शुभ समाचार मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त कष्ट घेण्याची गरज आहे. गुरुवार, शुक्रवार तुमच्यावर आरोप येईल. कोर्टकेसमध्ये तणाव वाढू शकतो. नोकरीत व्याप वाढेल. व्यवसायात फसगत होणार नाही हे पहा. शिक्षणात आळस नको.


मीन

प्रगती करण्यासाठी चौफेर वाटा मोकळय़ा दिसतील. अधिकार प्राप्ती होईल. मकर राशीत बुध प्रवेश व सूर्यचंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय- सामाजिक क्षेत्रात तुमची प्रति÷ा वाढेल. नोकरीचा प्रयत्न फलद्रुप होईल. व्यवसायात जम बसेल. थकबाकी वसूल करा. शनिवारी रागावर नियंत्रण ठेवा. संसारात जवळच्या व्यक्तीचा आधार मोठा वाटेल. शिक्षणात मागे राहू नका. जिद्द ठेवा.

Related posts: