|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » विविधा » पायी किंवा सायकलने भारतात येतात या देशाचे लोक

पायी किंवा सायकलने भारतात येतात या देशाचे लोक 

ऑनलाईन टीम / बिहार :

एककीकडे भारत – पपाकिस्तानमध्ये तनाव असताना भारताच्या काही राज्यांना नेपाळची सीमा लागलेली आहे. त्यापपैकी बिहारही एक आहे. उत्तर बिहारच्या काही जिह्यांत नेपाळची सीमा लागते. सीमेच्या आलीकडे आणि पलीकडे तर एकच गाव दिसते. केवळ या ठिकाणी असलेल्या कमानीवरील बोर्डमध्ये हे दोन वेगवेगळे देश असल्याचे लक्षात येते. सीमेपलीकडे नागरिक अगदी सहजतेने पायी – पायी किंवा सायकलने बाजार करण्यासाठी भारतात येतात. भारतातील नागरिकही तिकडे जातात. त्यांना कधी पाशपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता भासत नाही. म्हणजे दोन सख्खे शेजारी पण त्यांचा देश, नागरिकता वेगवेगळी आहे. थंडीच्या दिवसात तर दोन्ही देशातील काही नागरिक एकत्र येत निवांत शेकोटीजवळ बसतात.

दोन्ही दिशातील नागरिकांना एकमेकांच्या देशात येण्यासाठी कुठलीही सरकारी परवानगी घ्यावी लागत नाही. परंतु, या ठिकाणी दोन्ही देशांचे कस्टम पोस्ट आहे. त्यामध्यमातून सैन्य दलाचे जवान, पोलिस कर्मचारी येणाऱया जाणाऱयावर लक्ष ठेवतात. या सीमेवरज अलीकडून पलीकडून तेथील मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी औषधी, किराणा, इलेक्ट्रानिक अशी अनेक दुकाने आहेत. दोन्ही देशात नागरिक खरेदीसाठी एकमेकांच्या देशात जातात. अनेकांचे जवळचे नातेवाई परराष्ट्रात म्हणजे नेपाळमध्ये हाकेच्या अंतरावर राहतात.