|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर  केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असाताना मुंबई भाजपा अध्यक्ष अशिष शेलार यांनी रात्री अशीरा यादी जाहीर केली.

जाहीर  केलेल्या यादीत 195 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर उर्वरित 32 जागा भाजपाने मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातुन भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बरीच चर्चा होती मात्र त्या निवडणुक लढवणार नाहीत. मेधा यांच्याऐवजी तेजस्वीनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.