|Thursday, June 20, 2019
You are here: Home » क्रिडा » झुलन गोस्वामी, परिदाला भारतीय संघातून वगळले

झुलन गोस्वामी, परिदाला भारतीय संघातून वगळले 

महिला विश्वचषक पात्रता किकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

वृत्तसंस्था/ मुंबई

कोलंबो येथे दि. 7 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱया आयसीसी महिला विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेसाठी शुक्रवारी भारतीय संघ निवडण्यात आला. या भारतीय संघातून मध्यमगती गोलंदाज झुलन गोस्वामी व सुकन्या परिदा यांना वगळण्यात आले आहे.

7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱया या स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रवाना होणार आहे. शुक्रवारी 14 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतग्रस्त झुलन गोस्वामीच्या जागी सोनी यादवचा तर सुकन्या परिदाच्या जागी मानसी जोशीचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच बिग बॅश लीगमध्ये जखमी झालेल्या सलामीवीर स्मृती मंधानाच्या जागी मोना मेश्रामची संघात वर्णी लागली आहे. या पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून भारतासहित यजमान श्रीलंका, थायलंड, आयर्लंड व झिम्बाब्वे या संघाचा समावेश आहे. भारतीय संघ दि. 5 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर 7 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध पात्रता स्पर्धेतील पहिली लढत होईल. तसेच 8 फेब्रुवारी रोजी थायलंडशी, 10 रोजी आयर्लंड तर 13 रेजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे.

भारतीय महिला संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, सोनी यादव, मानसी जोशी, मोना मेश्राम, थिरुशकामगिनी, वेदा कृष्णमुर्ती, देविका वैद्य, सुषमा वर्मा, शिखा पांडे, पूनम यादव, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा.