|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सव्वा चारशे लोकांना मिळाला रोजगार

सव्वा चारशे लोकांना मिळाला रोजगार 

महापालिका रोजगार मेळावा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कोल्हापूर महापालिका, दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने रविवारी दि.5 रोजगार मेळावा घेण्यात आला. केएमसी कॉलेज परिसरात झालेल्या या मेळाव्यामध्ये 582 लोकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये 430 जणांना रोजगार उपलब्ध झाला.

 कोल्हापूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानवतीने कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता अंतर्गत सन 2015 पासून एकूण 907 लाभार्थाना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित लाभार्थ्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे मेळाव्याचे उद्दिष्ट आहे. 1091 पदासाठी हा मेळावा घेण्यात आला. विविध क्षेत्रातील 18 कंपन्याचे प्रतिनिधी यासाठी उपस्थित होते. यामध्ये 582 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी 430 लाभार्थ्यांची निवड झाली.

r सहा. आयुक्त  सचिन खाडे, सहायक संचालक जी. ए. सांगडे, कौशल्य आणि उपजीविकाचे व्यवस्थापक निवास कोळी, आय. एस. शेख, बळवंत सूर्यवंशी,  विजय तळेकर, रोहित सोनुले,  सचिन उपाध्ये, शालिग्राम लहासे  स्वाती शहा, अंजनी सौंदल्गीकर,  आदी उपस्थित होते.

Related posts: