|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परीक्षेत कॉपी केल्यास तीन वर्षे डिबार

परीक्षेत कॉपी केल्यास तीन वर्षे डिबार 

प्रतिनिधी/ बेळगाव

दहावी, बारावीसह इतर परीक्षांमध्ये कॉपीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी शिक्षण खाते व सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत कॉपी करतांना सापडल्यास विद्यार्थ्यांला तीन वर्षे परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर तीन वर्षासाठी पूर्णपणे बॅन राहिल. याबाबतचे विधेयक सरकारने तयार केले असून, येत्या अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे.

परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार पुढे आले असून प्रश्नपत्रिक फुटणे, कॉपी करणे, आदींवर आळा घालण्यासाठी शिक्षणमंत्री तनवीर शेठ आणि कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांनी नवीन विधेयक तयार केले आहे. येत्या काही दिवसात मंत्रीमंडळ बैठकीत हे विधेयक सादर करण्यात येणार असून त्यानंतर अधिवेशनात हे विधेयक ठेऊन मंजूर करूण घेतले जाणार आहे. त्यामुळे लवकरच हे नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेत दोनवेळा रसायनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याने राज्यभरात गोंधळ माजला होता. तसेच पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या कारभाराचे वाभाडे निघाले होते. त्यामुळे शिक्षणाच्या आणि परीक्षेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गय न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केल्यास 5 वर्षांसाठी कारावासाची तरतूद या नवीन विधेयकामध्ये मांडण्यात आली आहे. शिक्षण खात्याने आणि सरकारने घेतलेल्या या नवीन नियमांचे शिक्षण तज्ञामधूनही स्वागत करण्यात येत आहे.

एखाद्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्यास शाळेने किंवा पदवीपूर्व महाविद्यालयाने प्रोत्साहन दिल्यास त्या शाळांची मान्यता 3 वर्षासाठी माघार घेण्याची तरतूदही या नवीन विधेयकात आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांनादेखील परीक्षा घेतांना काळजी घेण्याची गरज आहे.

विद्यार्थी कॉपीकरतांना डिबार झाल्यास त्या विद्यार्थ्यांला पुढील 3 वर्षे परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उध्वस्त होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानीही अशा प्रकारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

Related posts: