|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » अनुराग ठाकुर यांनी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱयांची हकालपट्टी

अनुराग ठाकुर यांनी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱयांची हकालपट्टी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांना सर्वोच्च न्यायलाच्या लोढा समितीने बडतर्फ केले होते त्यानंतर आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि सचिव अजय शिर्के यांनी नियुक्ती केलेले कर्मचाऱयांची नोकरी काढून टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

सर्वोच्च न्यायलयाने माजी नियंत्रक आणि महालेख परीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची प्रशासकीय धुरा संभाळण्यास दिली आहे. या समितीने 30 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारून आठवडाही पूर्ण होत नाही. त्याआधीच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि सचिव अजय शिर्के यांच्या काळात झालेल्या नियुक्तींबाबतची पडताळणी देखील करण्यात येत आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी हे पूर्ण तपासणी करत आहेत. नवी दिल्लीमध्ये 1 फेब्रुवारीला प्रशासकीय समितीची बैठक झाली. या बैठकीमध्येत या अधिकाऱयांना काढुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.