|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण

भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण 

ऑनलाईन टीम / पुणे :

भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच खाकी वर्दीवर हात उचलल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर गर्दी केली होती. गर्दीला आवरण्यासाठी श्रीकांत खोत स्वतः गर्दीत शिरले. मात्र संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी खोत यांना घेराव घालून मारहाण केली. विशेष म्हणजे भोर तहसीलदार कार्यालयाबाहेरच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे यावेळी खोत यांच्या मदतीला एकही पोलिस धावला नाही.

Related posts: