|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोकणकन्यात दारू जप्त

कोकणकन्यात दारू जप्त 

कणकवलीगोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलीस बल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या मोहिमेमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. आठ हजार 60 रुपयांची दारू रेल्वे पोलिसांनी जप्त केली. मात्र, संशयित सापडू शकला नाही.

रेल्वे पोलिसांतर्फे सध्या रेल्वेत तपासणी मोहीम सुरू आहे. मंगळवारी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱया कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये तपासणी सुरू होती.  सायंकाळी 7.45 वा. सुमारास सावंतवाडी रेल्वे स्थानकानजीक पुढील जनरल डब्यात ही दारू आढळून आली. यामध्ये किंगफिशर व टुबर्गचे प्रत्येकी 24 डबे, डीएसपीच्या तीन बाटल्या, रॉयल स्टॅगच्या दोन बाटल्यांचा समावेश होता. कारवाईमध्ये रेल्वे पोलीस बलाचे उपनिरीक्षक मनोजकुमार, पोलीस विनोद पाटोळे, भूषण कोचरेकर, राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस सहभागी झाले होते.

 

Related posts: