|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » Top News » कोब्रा सापाबरोबर व्हिडिओ, अभिनेत्रीला अटक

कोब्रा सापाबरोबर व्हिडिओ, अभिनेत्रीला अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोब्रा सापाबरोबर सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करणे टीव्ही अभिनेत्रीला महागात पडले आहे. कोब्रा गळय़ात घालुन काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी शुतीचा छोटय़ा पडद्यावर ‘नागाजुर्न … एक योध्दा’ ही मालिका ‘लाईफ ओके’ वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱया अभिनेत्री श्रुती उल्फतने गाळय़ात नाग घालून दोन व्हिडिओ ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनासाठी तयार करण्यात आला होता श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. श्रुती उल्फतने अभिनय केलेले राझ, ऐतबार यासारखे चित्रपट गाजले हेते. त्याचप्रमाणे चलती का नाम अंताक्षरी हा टिव्हि शो आणि आय लव्ह यू, ससुराल गेंदा फूल, जमाई राजा, यासारख्या मालिकांमध्येही ती झळकली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही माहिन्यांपूर्वी टीका सुरू झाली होती. त्यानंतर श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या चौघांना अटक झाली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एक अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधी दोन व्यवसथापकांचा समावेश आहे.

Related posts: