|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आत्मचरित्रवर चित्रपटांची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, काही प्रसिध्द चेहरे, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून वेगळेच छाप पाडणारी व्यक्तिमत्त्व यांचा प्रवास उलगडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड निर्मातेही पुढे सरसावत आहे. खेळाडू, चित्रपट कलाकार ते अगदी राजकारण्यांच्या जीवनाचाप्रवास आजवर विविध चरित्रपटांद्वारे उलगडण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. किंबहुना हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे असेच म्हणावे लागणार आहे. भारतीय राजकारणातील एक प्रसिध्द व्यक्तीमत्त्व म्हणजे आम आदमी प्रार्टीचे प्रमुख आरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान असणाऱया अरविंद केजरीवाल यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला असून त्याविषयी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘ऍन इन्सिग्निफिकंट मॅन’ या चित्रपटामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आजवरच्या राजकिय कारकिर्दीचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यामुळे खुद्द अरविंद केजरीवाल यांनीही चित्रपटाची संकल्पना भावल्याचे सह – दिग्दर्शिका खुशबू रांका यांनी सांगितले आहे.