|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गारगोटी बाजारात साधला प्रा. अर्जुन आबीटकर यांनी संपर्क

गारगोटी बाजारात साधला प्रा. अर्जुन आबीटकर यांनी संपर्क 

प्रतिनिधी /गारगोटी :

पिंपळगाव जिल्हा परिषद मधुन विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबीटकर यांच्या पत्नी सौ. रोहिणी आबीटकर उभ्या आहेत. आबीटकर दापंत्याने दोनच दिवसापासुन प्रचाराला सुरवात केली असुन आज बुधवार गारगोटी येथिल आठवडी बाजार, याचे अवचित्य साधुन प्रा आबीटकर यांनी थेट लोकांशी संवाद साधला.

गारगोटी ही तालुक्याच्या दृष्टिने महत्वाची बाजरपेठ. एकुण तालुक्यातील बहुतांशी गावांचा संपर्क गारगोटीशी येतो.आमदार प्रकाश आबीटकर व माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या शाहु विकास आघाडीच्या माध्यमातुन प्रा. आबीटकर यांच्या पत्नी निवडणुक लढवत आहेत. आज पुर्ण दिवस  प्रा. आबीटकर यांनी गारगोटी बाजारपेठेत प्रमुख लोकांच्या गाठीभेठी घेतल्य़ा.

यावेळी चिदंबर कलकुटकी, विजय सारंग, विद्याधर परिट, संग्राम सावंत, धिरज गुदगे, किशन जठार, आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

 

Related posts: