|Saturday, January 19, 2019
You are here: Home » उद्योग » दायवाकडून 40 इंची स्मार्ट एचडी टीव्ही

दायवाकडून 40 इंची स्मार्ट एचडी टीव्ही 

वृत्तसंस्था /मुंबई :

आपल्या अधिपत्यामध्ये सखोल नाविन्य समाविष्ट असलेली कंपनी दायवाने तिच्या नवीन फुल एचडी 40 इंची स्मार्ट टीव्हीच्या सादरीकरणाची घोषणा केली. उच्च दर्जा, विशाल आकार, आकर्षकता व कार्यक्षमता यासंदर्भात अग्रेसर असलेली नवीन टीव्ही कंपनीच्या अधिपत्याखालील आणखी एक शो स्टॉपर असण्याच्या स्थितीत आहे. दायवा कंपनी ही भारतीय बाजापेठेमधील अधिकतम प्रमुख बँड्ससाठी उत्पादन करणारी 32 वर्षीय जुनी प्रिमिअर एलईडी टेलीव्हीजन ओडीएम कंपनी, व्हिडिओटेक्स इंटरनॅशनल प्रा. लि. चा भाग आहे.

नवीनतम फुल एचडी दायवा 40 इंची स्मार्ट टीव्ही विविध वैशिष्टय़ांनी युक्त आहे. जे. ए ग्रेड, झीरोबीआरटी डॉट पॅनेल, एफएचडी 1920-1080 स्क्रिन रिझॉल्युशन, सिनेम झूम मोड, 2 एचडीएमआय व एसडी कार्ड स्लॉटसह 2 युएसबी पोर्टस्, मल्टीमीडिया कनेक्टिव्हिटी, एम. कास्ट, वाय-फाय, अनोखे युएसबी ते पूझर ऑन रिमोट, उच्च क्षमतेचे इक्सटर्नल स्पीकर्स, गेमिंग सिस्टमने युक्त एचआरडीपी तंत्रज्ञान, जे. कलर व कॉन्ट्रस्ट सारख्या दर्जात्मक जीवनाची खात्री देतात. दायवा 40 इंची स्मार्ट फूल एचडी टीव्ही 22,990 रुपये किंपतीमध्ये ऍमेझॉन व स्नॅपडिलवर उपलब्ध आहे.

दाखलीकरणाबाबत बोलताना, दायवाचे संचालक अर्जुन बजाज म्हणाले, आमची 40 इंची फूल एचडी स्मार्ट टीव्ही ही सर्व गोष्टींच्या संदर्भात अग्रेसर उत्पादन आहे. तंत्रज्ञान उत्तमता, स्मार्ट वैशिष्टय़े, सुस्पष्ट व शार्प व्हिडिओ आणि उच्च क्षमतेची ऑडिओ क्वालिटी अशाप्रकारची वैशिष्टय़े आजकाल बाजारपेठेमधील काहीच उत्पादकांमध्ये पहायला मिळतात. पण, अशा आकर्षक दरांमध्ये नाही. आम्हाला प्रबळ विश्वास आहे की, हे उत्पादन टेलीव्हीजन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करेल.

Related posts: