|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » बिझनेस टीव्हीसाठी… महिंद्रा लाइफस्पेसची एसबीआयशी भागीदारी

बिझनेस टीव्हीसाठी… महिंद्रा लाइफस्पेसची एसबीआयशी भागीदारी 

 पुणे / प्रतिनिधी :

 महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल) या महिंद्रा समूहाच्या रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा विकास कंपनीने, भारतभरातील ग्राहकांसाठी माहिती व घर खरेदी सोल्यूशन देणारी सुविधा निर्माण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (एसबीआय) भागीदारी केली आहे.

 यावेळी बोलताना महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता अर्जुनदास म्हणाल्या, महिंद्रा लाइफस्पेसेस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे भारतातील ग्राहकांमध्ये विश्वास व पारदर्शकतेचे स्थान आहे. आमच्या ग्राहकांसाठी घरखरेदीची प्रक्रिया सुलभ करण्याचे आमचे प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच्या आमच्या सहयोगामुळे यशस्वी होतील.

 स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (रिअल इस्टेट व हाउसिंग व्यवसाय) एम. जी. वैजिनाथ म्हणाले, दोन्ही प्रसिद्ध ब्रँडच्या क्षमता एकत्र आणण्यासाठी एसबीआय आणि महिंद्रा लाइफ एकत्र आले आहेत. या करारामुळे माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी, प्रमोशनल कॅम्पेनसाठी आणि विशिष्ट करारांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल.