|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर सेनेचाच भगवा फडकणार

पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर सेनेचाच भगवा फडकणार 

प्रतिनिधी /राजापूर :

गेल्या 20 वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यात मोठया प्रमाणात  विकासाची कामे झालेली आहेत. त्याची पोचपावती सूज्ञ मतदार देतीलच. त्यामुळे राजापूर पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा यावेळीही अधिक डौलाने फडकेल असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी राजापूर येथे व्यक्त केला. यावेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना त्यांनी शिवसेनेशी असलेली नाळ न तोडता मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करावे व सेनेच्या उमेदवाराला निवडून दाखवाले. त्यांचे देव निश्चितच भले करेल असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजापुरात सेनेचे सर्व उमेदवार व पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, उपजिल्हाप्रमुख व ताम्हाने गणाचे उमेदवार अशोक सक्रे, आमदार राजन साळवी, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा महिला आघाडीप्रमुख सौ.शिल्पा सुर्वे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तालुका संपर्कप्रमुख चंदप्रकाश नकाशे, शिवसेनेचे जि.प. सहित पं.स.चे विद्यमान सदस्य व उमेदवार आदी मान्यवरांसहित सेनेचे पदाधिकारी उपस्थीत होते.