|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विठ्ठल रखुमाई माघी गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

विठ्ठल रखुमाई माघी गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद 

वार्ताहर /रत्नागिरी :

शहरातील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मित्रमंडळातर्फे माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. आज दुपारी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. उत्सवाचे यंदा 35 वर्ष आहे.

चित्रकला स्पर्धेचा निकाल असा : पहिली ते चौथी प्रांजल कुडचिकर (सेंट थॉमस इंग्लिश मिडियम स्कूल, कारवांचीवाडी), सेवा साळवी (मुकुल माधव विद्यालय, कोळंबे), रुद्र शिवलकर (परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिर), उत्तेजनार्थ सई प्रभूदेसाई (जीजीपीएस), आर्या कुंभार (अभ्यंकर विद्यामंदिर). पाचवी ते सातवी- श्रुती मुळीक (पटवर्धन हायस्कूल), सानिका घोसाळकर, हर्षल कडू (दोघेही फाटक हायस्कूल), उत्तेजनार्थ आर्यन चौघुले (शाळा क्र. 2), सोनम माळी (शिर्के प्रशाला). आठवी-नववी- ओम किल्लेकर (पटवर्धन हायस्कूल), सानिका इंदुलकर (पटवर्धन हायस्कूल), चिन्मयी प्रभुदेसाई (जीजीपीएस), उत्तेजनार्थ- ओंकार पाटणकर (पटवर्धन हायस्कूल), हर्ष कांबळे (फाटक हायस्कूल).

बक्षीस वितरणासाठी नगरसेवक राजू तोडणकर, प्रवीण हेळेकर, संजय शिंदे, अनिल शिंदे, मंदार मयेकर, पराग तोडणकर, संकेत मयेकर, गौरव हेळेकर, मनोज फणसोपकर, अभिजित पवार, केदार मयेकर, अवधूत शेटय़े, अनिल दांडेकर, दीपक वरेकर, रुपेश पंगेरकर, श्री. पवार, पराग हेळेकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या (ता. 6) सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर श्रींचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन करण्यात येणार आहे.